राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर बुलढाणा, येथे भव्य रोगनिदान व चिकित्सा शिबिर संपन्न
दि. २३.०६.२०२५ रोजी, द्वारका बहुद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशन बुलढाणा द्वारा संचालित, शाहू नगर- सागवन परिसरातील शैक्षणिक संकुलात स्थापित झालेल्या राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर बुलढाणा येथे शहरातील तसेच ग्रामीण भागातील जनतेसाठी मोफत आरोग्य रोगनिदान व मोफत चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक व सर्वेसर्वा मा. आमदार श्री. धृपतराव सावळे यांच्या संकल्पनेतून तसेच मार्गदर्शनातून स्थानीय जनतेच्या कल्याणार्थ हे शिबिर राबविण्यात आले.
शिबिराच्या सुरुवातीला सदर कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या सहसचिव अॅड. सौ. किर्तीताई समीर पऱ्हाड यांच्या शुभहस्ते फीत कापून तत्पश्चात धन्वंतरी पूजन करून करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी व वैद्यकीय चमूस प्रोत्साहन व प्रबोधनावर भाषण केले. शिबिरास शुभेच्छा दिल्या. शिबिरास महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री अमित बामरटकर ह्यांनी रुग्णालय अधिक्षक तसेच विशेष शल्य चिकित्सक म्हणून रुग्ण सेवा दिली. रुग्णालयाचे उप अधिक्षक डॉ. शेषराव काळवाघे, डॉ. प्रितमसिंग ठाकूर हे शिबिर सेवेत कार्यरत होते.
नेत्ररोग तज्ञ डॉ. प्रसाद निकम,शल्य तज्ञ डॉ. मयूर पडोळ हे व इतर सेवारत होते. रुग्णालयीन वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनल किनगे, डॉ. पूनम सावळे, डॉ. प्रियवंदा साखरे, डॉ. अनुराधा शिरसाट ह्यांनी रुग्ण तपासणी केली. रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आले. शिबिराचे नियोजन श्री. सत्यघोष बाहेकर, श्री. गणेश किनगे ह्यांनी केले. शिबिरास स्थानिक जनतेचा भव्य प्रतिसाद मिळाला. एकूण २१० रूणांनी ह्या वेळी उपस्थिती नोंदविली. महाविद्यालय व रुग्णालयीन सर्व कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यात मोलाची जबाबदारी बजावली.
नशामुक्त भारत अभियानात मार्गदर्शन
पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांचेकडून राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद कॉलेज बुलढाणा येथे नशामुक्त भारत अभियानात मार्गदर्शन
नेत्ररोग
शिबिर
राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर बुलढाणा,
येथे सुवर्ण प्राशन शिबीर संपन्न
दि. २५.०७.२०२५ रोजी, द्वारका बहुद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशन बुलढाणा द्वारा संचालित, शाहू नगर- सागवन परिसरातील शैक्षणिक संकुलात स्थापित झालेल्या राजर्षीशाहू महाराज आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर बुलढाणा येथे शहरातील तसेच ग्रामीण भागातील बालकांसाठी सुवर्ण प्राशन शिबिर आयोजित करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक माजी आमदार श्री. धृपदराव सावळे यांच्या मार्गदर्शनातून स्थानीय बालकांच्या रोगप्रतिकारक क्षमतेची वाढ व बुद्धीवर्धक म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने औषधी सिद्ध सुवर्ण कल्पाचे मोफत प्राशन बालकांना करण्यात आले. ह्यामुळे बालकांमध्ये असलेले कुपोषण दूर होण्यास मदत होते. अभ्यासात एकाग्रता निर्माण होते.
ग्रामीण भागातील गरीब जनतेचे बालक किंचित महाग असणाऱ्या ह्या औषधापासून वंचित राहू नये म्हणून संस्थेमार्फत हे प्राशन सर्वांना मोफत देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या सहसचिव अॅड. सौ. किर्तीताई समीर पऱ्हाडयांनी बालकांना त्यांच्या हस्ते सुवर्ण प्राशन देऊन केली.
शिबिरास महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री अमित बामरटकर, रुग्णालयाचे उप अधिक्षक डॉ. शेषराव काळवाघे, डॉ. प्रितमसिंग ठाकूर हे शिबिर सेवेत कार्यरत होते.
रुग्णालयीन वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनल किनगे, डॉ. पूनम सावळे, डॉ. प्रियवंदा साखरे, डॉ. अनुराधा शिरसाट, डॉ. रुपाली मेहेर ह्यांनी बालकांच्या पालकांना सुवर्ण प्राशनाचे फायदे व पुढील शिबिराची माहिती दिली. शिबिराचे नियोजन श्री. सत्यघोष बाहेकर, श्री. गणेश किनगे ह्यांनी केले.
महाविद्यालय व रुग्णालयीन सर्व कर्मचाऱ्यांनी सहयोगाने सदर शिबिर यशस्वी केले.
राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद कॉलेज बुलढाणा तर्फे खामगाव शेगाव पायी वारकऱ्यांसाठी भव्य आरोग्य शिबिर संपन्न
दि. ३१.०७.२०२५ रोजी, द्वारका बहुद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशन बुलढाणा द्वारा संचालित राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर बुलढाणा यांचे कडून पंढरपूर हून शेगावला परतीच्या प्रवासात वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सदर वैद्यकीय व रुग्णालयीन चमू उपस्थित होती.
श्री संत गजानन महाराज पालखी सह अगणिक भाविक खामगाव ते शेगाव पायी वारी करतात. त्यात अगदी बालकांपासून ते वयोवृध्द जनता माउलींच्या दर्शनासाठी पालखीत सहभागी होतात. ह्या मार्गात जनतेच्या सेवेसाठी मोफत आरोग्य रोगनिदान व मोफत चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. माजी आमदार श्री. धृपदराव सावळे व अॅड. सौ. किर्तीताई समीर पऱ्हाड यांच्या संकल्पनेतून तसेच मार्गदर्शनातून हे शिबिर राबविण्यात आले. रक्तदाब तपासणी, रक्त शर्करा तपासणी, सामान्य आजारांवर उपचार, थकवा दूर करण्यासाठी ओ आर एस च्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. पायी चालून थकलेल्यांना औषधी सिद्ध काढ्यांनी पायांना कोष्ण शेक देण्याची सोय करण्यात आली होती. शिबिरास जनतेचा भव्य प्रतिसाद मिळाला.
रोग निदान व रुग्ण भरती शिबीर
दि. 20 जून 2022 रोजी राजर्षि शाहू महाराज आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च इंस्टीट्यूट बुलडाणा येथे भव्य रोग निदान व रुग्ण भारती शिबीर पार पडले. या शिबिरात 380+ रुग्णांनी लाभ घेतला.
योग शिबीर
दि. 21 जून 2022 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त राजर्षि शाहू महाराज आयुर्वेद हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे मोफत योग शिबीर आयोजित करण्यात आले.
राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती
दि. 26 जून 2022 रोजी राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतीमेचे पूजन करून पुशहार अर्पण करण्यात आले. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.धृपदराव सावळे पाटील (मा.आमदार) तसेच सचिव मा.सौ.पद्माताई सावळे पाटील व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सव
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित स्वातंत्र दिनानिमित्त तिरंगा ध्वजारोहण मा.डॅा. श्री.समीर दादा प-हाड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी संस्थेच्या सचिव सौ.पद्माताई सावळे, सह-सचिव सौ.किर्तीताई प-हाड सह हॅास्पिटल व कार्यालयीन कर्मचारी या सोहळ्यात सहभागी झाले.